जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्मोत्सव महोत्सव आज... महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात...

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त येत्या २ फेब्रुवारी रोज सोमवारला कुणबी समाजसेवा समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन शहरातील कारमेल स्कूलच्या मागील शिवमंदिर परिसरातील कुणबी समाजभवनाच्या नियोजित जागेवर करण्यात आले आहे.
सोमवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कुणबी समाजबांधवांचे एकत्रिकरण, सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, सकाळी ९.३० वाजता महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दुपारी २ वाजता आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, दुपारी ३ वाजता समाजातील महिलांचे हळदी कुंकू व विविध कार्यक्रम, दुपारी ३.३० वाजता भजनसंध्या, सायंकाळी ४ वाजता पालखी


 सोहळा कुणबी समाजभवनातून शिवाजी महाविद्यालय, रेड्डी गोडावून चौक, चामोर्शी रोड, इंदिरा गांधी चौक येथून परत समाजभवनात पालखीचा समारोप होणार आहे. सायंकाळी ६ वाजता प्रबोधन कार्यक्रम होणार असून वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक नीतेश गोहणे, राजश्री गोहणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता सत्र २०२५ मधील इयत्ता दहावी, बारावीतील समाजातील गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचारी व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी गडचिरोली शहर व परिसरातील बहुसंख्य कुणबी समाजबांधवांनी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजसेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments