चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील सावली टोल नाक्याजवळ ट्राव्हल्स पलटी , अनेकजन गंभीर जखमी...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


सावली - सावली तालुक्यातील टोल नाक्याजवळ चंद्रपूर वरून गडचिरोली येणारी खाजगी ट्राव्हल्स ची पलटी झाल्यामुळे बसमधे असलेल्या अनेक प्रवासांना दुखापत झाली असुन प्रवासांना ग्रामीण रुग्णालय सावली तर गंभीर जखमी झालेल्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.
प्राप्त माहीतीनुसार MH 4 Gp 1736 क्रंमाची ट्राव्हल्स चंद्रपूर वरून गडचिरोली येत असतांना आज दिनांक २४ जानेवारी २०२६ दुपारी 3.30 चे दरम्यान सावली टोल नाक्याच्या पहिलेच टु व्हिलरला



 वाचविण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हर चे संतुलन बिघडले व सदर ट्राव्हल्स रोडच्या कडेला पलटी झाली.
ट्राव्हल्स मधे ३५ प्रवासी होते यात सावली वरून येणारे शाळेकरी मुले सुद्धा बसली होती. अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झालेत तर १५ प्रवासी किरकोड जखमी झाले. सावली पोलीसांना माहीती मिळताच ठाणेदार आपल्या ताफ्यासहीत घटना स्थळावर




 पोहचले.काहींना ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले तर गंभीर जखमिंना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सदर अपघात स्थळी तोबा गर्दी जमली होती. ट्रायव्हर व गंभीर जखमीचे नाव कळू शकले नाही.


0/Post a Comment/Comments