विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील मरेगांव येथील शेतशिवारात दि.१ फरवरीच्या रात्रौ हत्तीच्या कळपाने धुमाकुळ घालून अनेक शेतकऱ्यांच्या तुरी व कडधान्य पिकावर ताव मारून आज सकाळी मरेगांव रांगी परिसरात जंगलात हत्तीच्या कळपाने पलायन केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
२० ते २५ च्या संख्येनी असलेले हत्तीचे कळप गेल्या आठ दिवसापासून बेलगांव - रांगी डोंगर भागात वास्तव करीत असुन कालच्या रात्रौ हत्तीचा कळप मरेगांव शेतशिवारात प्रवेश करून साईनाथ पोरटी व योगाजी पोरटी मरेगाव टोली यांच्या शेतातील तुरी व कडधान्य उद्वस्त केले मागील वर्षी विकास येरमे ह्या शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले होते. हत्तीच्या कळपामुळे मरेगांव वासीय भयभित झालेले आहेत. मरेगांव येथे वनविभागाचे कार्यालय असुन राऊड ऑफीसर दोन वनरक्षक असतात परंतु ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे हत्तीच्या कळापाकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. वनविभाग पोर्ला चे RF0 पंचभाई यांना फोन केले असता नॉट रिचेबल दाखवितो त्यामुळे पंचभाई कडून माहिती मिळू शकली नाही.

Post a Comment