उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल आरमोरी येथे सर्वपक्षीय शोकसभा


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 


महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.
त्याबद्दल आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली व शोकसभा आयोजित करण्यात आली.
या शोक सभेचे अध्यक्ष स्थानी माजी आमदार, डॉ. रामकृष्ण मडावी होते.
यावेळी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, भारतीय कॅम्युनिस्ट पार्टी चे डॉ. महेश कोपुलवार, श्रीहरी कोपुलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, शिवसेना उबाठा च्या हेमलता वाघाडे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, जयकुमार मेश्राम,पतंजली योग समिती चे सत्यनारायण चकिनारपवार, यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनामुळे विकासाचे दृष्टिकोन असणाऱ्या व महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकलेला असून त्यांची उणीव सदैव भासणार असल्याचे आपल्या शोकसंवेदणेत व्यक्त केले.
शोकसभेला नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, नगर परिषद उपाध्यक्ष विलास पारधी, नगरसेवक भारत बावनथडे, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेवक अक्षय बागडे,प्रतिष्ठित व्यापारी चंदू वडपल्लीवार, रामभाऊ कुरझेकर, विजय सुपारे, नंदू पेट्टेवार, दिलीप मोटवानी, सुशील पोरेडडीवर, बाळाजी बोरकर, सुनिल नंदनवार,. दिनेश बनकर अमीन लालानी, प्रदिप हजारे, जिल्हा नियोजित समिती च्या माजी सदस्या कल्पना तिजारे, हरिराम मातेरे, अक्षय बोरकर, भुवनेश्वर सेलोकर चारुदत्त राऊत, सारंग जांभुळे, कंत्राटदार अविनाश चहांदे, चिंतामन ढवळे, राकेश बेहरे, रिंकू जरकर, धर्माजी झरकर, रामदास दहिकार, ठामेश्वर मैद, किशोर अलोने, देवानंद बोरकर, विनोद बेहरे वृषाली भोयर, संगीता मेश्राम, ज्योत्स्ना जोध, प्रज्ञा निमगडे, शुभांगी गराडे, विद्या मेश्राम, कविता भोयर, पल्लवी रामटेके, शेषराज सोनकुसरे, राजेश हेमके, सुनिल ठाकरे, बंडू रामटेके, प्रशांत मोगरे, श्रीधर पोटेकर आणि सर्व राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सामूहिक श्रद्धांजली वाहून शोकसभेची सांगता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments