विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
व्याहाड - दिनांक १५ जानेवारी २०२६ सायंकाळी ७ वाजता फोर व्हिलर व टु व्हिलर मधे हिरापुर फाट्या जवळ झालेल्या भिषण अपघातात मृत्यू पावलेले नागेश भगत 30 , म्हशाखेत्री २९ व गंभीर जखमी झालेला सौरव मांडवकर २७ हे सर्व राहणार चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली येथील राहणारे असून सावली पोलीसांना डॉ. गोपाल रायपूरे यांनी फोन केला असता सावली पोलीसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतक व जखमीना ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत्यु घोषीत केले तर गंभीर जखमी सौरव यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
फोर व्हिलर वाल्याच्या धडकेने MH 33 AB 7986 टु व्हिलर गाडीची तोडफोड झाली तर तिघेही गंभीर अवस्थेत रोडवर सडगान पडले होते. अपघात कुणी घडविला व कोणत्या गाडीने याचा शोध कॅमेराद्वारे सावली पोलिस शोध घेत आहेत. क्रमांक १०८ ची ॲम्ब्युलन्स सावली येथे फोन लावूनही गाडी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.


Post a Comment