हिरापुर फाट्याजवळ भिषण अपघात.. दोन ठार एक गंभीर..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


व्याहाड - गडचिरोली चंद्रपूर रोडवरील हिरापुरे फाट्याजवळ टु व्हिलर गाडीचा भिषण अपघात होवून दोघेजन जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असून फोर व्हिलर गाडीने उडवुन फरार झाला.
आज दिनांक १५ जानेवारी २०२६ सांयकाळी ७ चे दरम्यान MH 33 AB 7986 टु व्हिलर गडचिरोली ची असावी त्यावर जवान तिघेजन सावली वरून



 गडचिरोली जात असतांना एका अज्ञान फोर व्हिलर वाहनाने उडवून पसार झाला. अपघात एवढा जबरदस्त होता की टु व्हिलर चे तोंड सावली रोडकडे वळून एकाचा मोबाईल दुरवर फेकल्या गेला. गाडीचे समोरील भाग तुटकुट झाला. त्यात दोघे जागीच ठार झाले तर एकाला होस होता. रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष डॉ. गोपाल रायपूरे यांनी सावली पोलीस स्टेशनला माहिती दिली तर १०८ ला सुद्धा फोन करून सहकार्य केले.




 मृत्युकांची नावे कळू शकले नाही परंतु टोल नाक्याजवळ कॉमेरा असल्यामुळे अपघात घडविणारा लवकरच सापडू शकतो सावली पोलीसांनी शोध घ्यावा.

0/Post a Comment/Comments