विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी
आरमोरी मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे महिला बचत गटाच्या वतीने सरकारी स्वस्त धान्य दुकान चालवले जात आहे. मार्च महिन्यामध्ये शासनाकडून कोजबी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाला गहू व तांदळाचा पुरवठा
करण्यात आला आहे आणि सध्या स्वस्त धान्य दुकानातून राशन कार्ड धारकांना मार्च महिन्याचा गहू व तांदळाचे वाटप सुरू करण्यात येत आहे. वाटप करताना तांदळाच्या कट्ट्या ऐवजी दोन ते तीन कण्याचे कट्टे आढळल्याने राशनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे बचत गटाच्या वतीने सरकारी स्वस्त धान्य दुकान येथील वाटप धारक गणेश मडावी यांना विदर्भ दखलचे प्रतिनिधी यांना माहिती देऊन प्रत्यक्षरीत्या आलेले कण्याचे कट्टे दाखवले असता प्रतिनिधीने सविस्तर माहिती जाणून घेतली त्यांना विचारले असता तहसील कार्यालयाच्या वतीने मार्च महिन्यामध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानाला मार्च महिन्याचा
तांदळाचा गव्हाचा पुरवठा करण्यात आला यामध्ये मध्ये दोन ते तीन प्रकारचे करण्याचे कट्टे आले. आणि ते राशन धारकांना वाटप करीत असल्याचे त्यांनी सांगितले सविस्तर माहिती करिता तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. सरकारी स्वस्त धान्य दुकानांमध्ये कण्याचे कट्टे चुकून आले की जाणून बुजून पाठवण्यात आलेत याची खात्री मात्र चौकशी अंतिच कळेल असे कोजबी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील गहू तांदूळ गहू वाटप धारक गणेश मडावी यांनी सांगितलेआहे. शासनाच्या वतीने सरकारी स्वस्त
धान्य दुकानाच्या माध्यमातून लोकांना गहू व तांदळाचे वाटप करण्यात येते. मात्र सरकारी स्वस्त धान्य दुकानांमध्ये तांदूळ ऐवजी कण्याचे कट्टे आल्याने राशनधारकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तांदुळा ऐवजी कण्याचे कट्ट्या आल्याने याची चौकशीची मागणी कोजबी येथील राशनधारकांनी प्रशासनाला केली आहे.




Post a Comment