विदर्भ दखल न्यूज
आरमोरी वैरागड
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या वैरागड ते करपडा मुख्य रस्त्यावर खोब्रागडी नदी समोरील टर्निंग पॉईंटवर दि.7.4..2026 मंगळवार रोजी सायंकाळी 7.30 वाजे सुमारास दुचाकी धारकाचा अपघात झाला . सामाजिक कार्यकर्ते भारत कुमरे हे आपल्या चार चाकी वाहनाने वैरागड समोरील करपडा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने
जात असताना टर्निंग पॉईंटवर दूचाकी धारक खाली पडला असल्याचे दिसल्याने लगेच आपले चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून जखमी अपघातग्रस्त जवळ जाऊन काही सहकारी यांच्या मदतीने त्याला आपल्या चार चाकी वाहनांमध्ये मांडून वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारा करीत दाखल केले आहे. सामाजिक कार्यकर्ते भारत कुमरे यांच्या
निस्वार्थी सामाजिक कार्याबद्दल जनतेकडून आभार व्यक्त होत आहे . सामाजिक कार्यकर्ते भारत कुमरे यांनी या अगोदर सुद्धा माणुसकीचा धर्म जोपासून वेळ प्रसंगी बहुतांश ठिकाणी अनेकांना आपल्या निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे .



Post a Comment