विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
गडचिरोली येथील आरमोरी रोडवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आवारामध्ये दिनांक ४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या 🏧 मध्ये येणाऱ्या ग्राहकाला बिबट्याच्याचे पिल्लू दडून बसल्याचे दिसले. लगेच ग्राहकांनी बँकेच्या व्यवस्थापक यांना बिबट्याचे पिल्लू दडून बसल्याची माहिती दिली
लगेच बँकेच्या व्यवस्थापकाने वनविभागाला माहिती दिली वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्याशी संपर्क साधला. वनविभागाचे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पिल्याचा शोध घेणे सुरू केला. बँकेच्या आवारामध्ये बिबट्याचे पिल्लू आढळल्याने
परिसरामध्ये बिबट्याच्या पील्ल्याचे मादी बिबट परिसरात असण्याची दाट शक्यता वर्तवीण्यात येत आहे यामुळे परिसरातील जनतेमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बँकेच्या परिसरात मागच्या बाजूला तलाव असून
तलावामध्ये झाडे झुडपे वाढले असल्याचे दिसते आणि संरक्षण भिंत सुद्धा काही ठिकाणी तुटफुट झाली आहे बँकेच्या सभोवताल संरक्षण कंपाऊंड मजबूत रित्या उभारल्याने बँकेला आणि बँकेत येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा संरक्षण म्हणून आणि सोयीचे होईल.

Post a Comment