चरविदंड ग्रामपंचायत चौकशीच्या दिवशीच ग्रामपंचायत सचिव रजेवर . धक्कादायक प्रकार: चौकशीसाठी नियुक्त अधिकारी चौकशी विना परतले माघारी ग्रामस्थांमध्ये पहावयास मिळाला रोष


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली

*चरविदंड  (कुरखेडा ):* गट ग्रामपंचायत चरविदंड येथील कारभाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेले अधिकारी चरवी दंड येथील ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले असता ग्रामपंचायतीच्या सचिव रजेवर गेल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांना एकच धक्का बसला आणि ग्रामपंचायत  कार्यालयाला टाळा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला 
मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील  चरविदंड ग्रामपंचायतीच्या तक्रारींच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावरून चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीसाठी *श्री. एस. व्ही. खांडरे (विस्तार अधिकारी - कृषी)* आणि *श्री. अमित दूरबुळे (वरिष्ठ सहायक - पंचायत)* या दोन अधिकाऱ्यांची प्रशासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली होती.

चरवी दंड ग्रामपंचायतची चौकशी करण्याकरिता प्रशासनाने नियुक्त केलेले  दोन्ही अधिकारी नियोजित वेळेत चरविदंड ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. मात्र त्यावेळी *सचिव मॅडम ऐनवेळेवर रजेवर* गेल्याचे सांगण्यात आले आणि कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी विना कार्यालयाच्या दारातूनच माघारी परतावे लागले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठा आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतच्या ऐन चौकशीच्या दिवशीच सचिव रजेवर जाणे, हा चौकशी टाळण्याचा प्रयत्न आहे का? असा गंभीर सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी वेळेत उघडे असणे बंधनकारक असताना, जबाबदार अधिकारीच गैरहजर राहत असतील तर सर्वसामान्य जनतेची कामे कशी होणार? असे सुद्धा ग्रामस्थांमधून बोलले जाऊ लागले आहे.
संबंधित. प्रकरणी संबंधित सचिवावर प्रशासकीय कारवाई करावी आणि ग्रामपंचायत कारभाराची उच्चस्तरीय चौकशी pसमिती नेमून सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, कुरखेडा यांच्याकडे केली असल्याचे माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायतीचे सचिव चौकशीच्या दिवशीच गैरहजर असल्याने आणि रजेवर गेल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये चरवीदंड येथे रोष पहावयास मिळाला.

0/Post a Comment/Comments