सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी भ्रष्टाचारासह फसवणुकीची पोलीस ठाण्यात केली तक्रार.. सरपंच सचिवावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. तक्रारीकडे लागले जनतेचे लक्ष..

    विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 
7822082216



कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथील प्रकरण 
नामे श्री.दिवाकर पांडुरंग निंदेकर वय 47 वर्ष सचिव / ग्रामसेवक गट ग्रा.पं. सावलखेडा,श्री.अविनाश भाग्यवान टेकाम वय 35 वर्ष, तत्कालीन सरपंच गट ग्रा.पं. सावलखेडा यांनी आर्थीक गैरव्यवहार,अपहार व अनियमीतता करून अप्रामाणीकपणे भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळवुन शासनाचे 16 लाख 69 हजार 232/- रु. चे आर्थीक नुकसान केल्याने त्यांचेविरुध्द फौजदारी कार्यवाही होणे संबंधांने गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास विकास अधिकारी श्री.देवा उराडे यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात दिनांक २७ ऑगस्ट २०२६,ला तक्रार दाखल केली.
ऑनलाईन शब्दकोश आणि ज्ञानकोश वापरणे
नागरी हक्क आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवणे
कायदेशीर सल्ला आणि सेवा मिळवणे
सरकारी नोकऱ्यांचा शोध घेणे
भौगोलिक नकाशे आणि संदर्भ एक्सप्लोर करणे
साहाय्यक गटविकास अधिकारी श्री.देवा उराडे यांच्याद्वारा तक्रार दाखल होताच ग्रामसेवक श्री.दिवाकर निंदेकर,तात्कालीन सरपंच श्री.अविनाश टेकाम यांच्यावर भारतीय दंड संहिता ४०९,४२०,४६७,४६८,४७१,३४ अंतर्गत आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शासनातर्फे देवा भगवान उराडे वय 50 वर्ष व्यवसाय नौकरी (सहा. गट विकास अधिकारी, पं.सं. कुरखेडा) रा. ता. कुरखेडा जि. गडचिरोली मो.क्रं. 9420145057,यांनी तक्रार दाखल केली.

तक्रारीत म्हटले आहे कि,आरोपी हे गट ग्रामपंचायत सावलखेडा ता. कुरखेडा येथे कार्यरत असतांना दिनांक 01/04/2021 ते दिनांक 31/03/2022 या आर्थीक वर्षात एकत्रीत निधीचे सन -2021-22 चे अंतीम लेखा परिक्षण,स्थानिक निधी लेखा परिक्षण महा.रा. गडचिरोली चे श्री.सु.शि.पाझारे कनिष्ठ लेखा परिक्षक यांनी दिनांक 07/07/2023 ते दिनांक 10/07/2023 या कालावधीत केले आहे. 
सदर लेखा परिक्षण हे मा.सहायक संचालक लेखा परिक्षा,म.रा.गडचिरोली यांनी दिनांक 09/10/2023 ला सरपंच ग्रा.पं. सावलखेडा यांना सादर केला.तसेच सदर लेखा परिक्षणाची एक प्रत पंचायत समिती, कुरखेडा येथे पुढील कारवाई करीता सादर केली होती.

सदर लेखा परिक्षण अहवालात आरोपीतांनी संगनमत करुन महा. ग्रामपंचायत अधिनियम आणि लेखा संहीता -2011 चे उल्लंघन करुन शासनाचे 16,69,232/- रु. चा आर्थीक गैरव्यवहार,अपहार व अनियमीतता करुन अप्रामाणीक पणे भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळवुन शासनाचे आर्थीक नुकसान केल्याची बाब निष्पन्न झाल्याने नमुद आरोपी विरुध्द कायदेशीर तक्रार देणे कामी सा.गट विकास अधिकारी देवा उराडे यांना शासकीय अधिकृत फिर्यादी म्हणुन गट विकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा यांनी कायदेशीर अधिकार सुपूर्त केले.

दिनांक 28/08/2026 रोजी स्थानिक निधी लेखा परिक्षण महा.रा.गडचिरोली यांचे डीट रिपोर्ट सह पोलीस स्टेशन आरमोरी येथे येवुन आरोपी नामे 1) दिवाकर पांडुरंग निंदेकर वय 47 वर्ष सचिव / ग्रामसेवक गट ग्रा.पं. सावलखेडा 2) अविनाश भाग्यवान टेकाम वय 35 वर्ष, तत्कालीन सरपंच गट ग्रा.पं. सावलखेडा यांचे विरुध्द तक्रार साहाय्यक गटविकास अधिकारी देवा उराडे यांनी दिली आहे.

आरोपी नामे दिवाकर पांडुरंग निंदेकर वय 47 वर्ष सचिव / ग्रामसेवक गट ग्रा.पं. सावलखेडा अविनाश भाग्यवान टेकाम वय 35 वर्ष, तत्कालीन सरपंच गट ग्रा.पं. सावलखेडा हे गट ग्रामपंचायत सावलखेडा ता. कुरखेडा येथे कार्यरत असतांना दिनांक 01/04/2021 ते दिनांक

II.F.-I (एकीकृत अन् वेषणफॉर्म – १) 31/03/2022 या आर्थीक वर्षात एकत्रीत निधीचे सन 2021-22 या कालावधीत गैरव्यवहार, अपहार व अनियमीतता करुन शासनाचे नुकसान केलेली रक्कम व निधीचे नाव खालील प्रमाणे आहे.

1) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील रोखवही नुसार सन-2021-22 या कालावधीत ग्रामनिधी, 5% अंबंध निधी व पाणी पुरवठा निधीतुन 27,89,70/- रु. ची विद्युत साहीत्य खरेदी व इतर बाबीवर खर्च करतांना महा.ग्रा. पंचायत लेखा संहीता 2011 नुसार पारदर्शकतेने निवीदा प्रकीया न अवलंबीता केलेला खर्च व गैर व बेकायदेशीर आहे. नेव्हिगेशननकाशे डाऊनलोड करणे

2) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील मोरी बांधकाम करणे या करीता 52,000/-रु. खर्च रोखवहीत नोंदवीण्यात आला आहे. परंतु काम पुर्ण झाल्यावर पुर्णत्वाचे प्रमाणपत्र मोजमाप पुस्तीकेत विहीत नमुण्यात नोंदवीले नाही. कामावरील मजुरांचा विमा शासकीय विमा निधी मुंबई यांचे कडे उतरवीणे आवश्यक असतांना तशी कारवाई झाली नाही यावरुन सदरचे कामात अनियमीतता व गैरव्यवहार झाला आहे.

3) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील ग्रामनिधी अंतर्गत रोख वहीत नाली, गठारे उपसणे, गाळ मलबा फेकणे यावर रु.72,000/- खर्च नोंदवीला असला तरी वार्ड निहाय कोणत्या वार्डात नाली / विहिर किती फुट/ इंच आहे. व किती मिटर लांब उपसली याबाबत चा कोणताही दस्तऐवज उपलब्ध न ठेवता परस्पर शासकीय रक्कमेचा गैरव्यवहार केला आहे.

4) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त त आयोग निधी अंतर्गत सन 2021-22 वर्षामध्ये मोरी बांधकामावर 1,60,200/- रु. खर्च नोदवीला असला तरी शासण निर्णय 21 सप्टेबर 2020 नुसार विहीत ग्रामसभा घेवुन गावाचा कृती आराखडा न ठरवीता व ई-ग्रामस्वराज्य पोर्टलवर दुसऱ्या ग्रामसभेत मंजुर असलेला कृती आराखडयाचा ठराव अपलोड न करता रोख पुस्तकात 1,60,200/- रु. चा खर्च नोदंवुन गैरव्यवहार केला आहे.

5) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील सन-2021-22 मध्ये 15 व्या वित्त आयोगातुन 1,47,972/- रु. खर्च नोंदवीण्यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र माध्यमातुन केंद्र शासनाच्या ई पंचायत प्रकल्प -11 एनआयसि आज्ञावली मध्ये ग्रामपंचायत लेखा संहीता 2011 नुसार ठरवुन दिलेले 1 ते 33 रजिस्टर डिजीट लाईड व ऑनलाईन करणे बंधनकारक असतांना नमुणे 1 ते 33 एन.आय. सि. आज्ञावली मध्ये न ठेवता. 1,47,97 शिर्शि2/- रु निरर्थक खर्च नोंदवुन अपहार केलेला आहे. नेव्हिगेशननकाशे डाऊनलोड करणे

6) गट ग्रामपंचायत सावलखेडा येथील गावाअंतर्गत पाणी पुरवठा, वाढीव पाईप लाईन नळ जोळणी करणे करणे या करीता 8,58,090 /-रु. खर्च तसेच कार्यात्मक नळ जोळणी करीता 1,00000/- असे एकुण 9,58,090 /- रु. रोखवहीत नोंदवीण्यात आला आहे.

परंतु काम पुर्ण झाल्यावर पुर्णत्वाचे प्रमाणपत्र मोजमाप पुस्तीकेत विहीत नमुण्यात नोंदवीले नाही.कामावरील मजुरांचा विमा शासकीय विमा निधी मुंबई यांचे कडे उतरवीणे आवश्यक असतांना तशी कारवाई झाली नाही यावरुन सदरचे कामात 9,58,090 /- रु. चा अनियमीतता व गैरव्यवहार झाला आहे.

वरील प्रमाणे आरोपींनी संगनमत करुन शासणाचे विवीध योजनाचे कामाचे एकुण 16 लाख 69 हजार,232/- रु. चा आर्थीक गैरव्यवहार,अपहार व अनियमीतता करुन अप्रामाणीक पणे भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळवुन शासनाचे आर्थीक नुकसान केले आहे. करीता आरोपीतांविरुध्द कलम 409,420,467,468,471 (a), 34 भारतीय दंड विधान संहीता अन्वये गुन्हा नोंद होणेस कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.

सहपत्र :- 1) दिनांक 12/06/2013 चे शासण परिपत्रकाची प्रत 1 पान…
2) गट ग्रामपंचायत सावलखेडा चे सन-2021-22 चेडीट नोटस 28 पाने…
3) शासना तर्फे फिर्यादी म्हणुन नियुक्तीचे आदेश 1 पान….
4) आरोपी नामे दिवाकर निंदेकर यांना बजावलेली नोटीस ची प्रत 6 पाने….
      सावलखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक व माजी सरपंच यांच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तक्रारींकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments