विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
वैरागड
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैरागड येथे भोलू सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने भव्य मीना बाजार (मेळा) आयोजित करण्यात आला असून, या मेळ्याचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या शितल सोमनानी यांच्या हस्ते मीना बाजाराचे उद्घाटन झाले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या मीना बाजारामुळे वैरागड परिसरातील नागरिकांसह लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळ्यात विविध प्रकारची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कुटुंबासह मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच वैशाली डोंगरवार, माजी सरपंच गौरी सोमनानी, माजी ग्रामपंचायत सदस्य नलिनी सहारे, भोलू सोमनानी, सुषमा चिंचोलकर, पार्वती डोंगरवार, शोभा सोमनानी, विभा आंबोरकर, रुचित बोधनकर, अभिमन्यू नव्हाते, ओम आकरे, उमाकांत सहारे यांच्यासह मित्र परिवारातील सदस्य व नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मीना बाजाराचे आयोजन करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वैरागडकरांसाठी मीना बाजार ठरणार आकर्षणाचे केंद्र असून, पुढील काही दिवस येथे नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment