विदर्भ दखल न्यूज
प्रतिनिधी
भंडारा पवनी
जिल्ह्यातील पवनी मोहाडी तालुक्यातील निलज गाव परिसराजवळ हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग दिनांक 23..8..2026 ला रविवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार त्रिवेणी कंपनीचे हेलिकॉप्टर नागपूर वरून रायपूर कडे हेलिकॉप्टर पायलट व दोन प्रवाशा ससित रायपूरला निघाले होते मात्र अचानक हवामानांमध्ये बदल झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरच्या पायलटने निलज येथील तलाव
परिसरातील पठारावर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केली हेलिकॉप्टर मध्ये पायलट सह दोन प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरची लँडिंग निलज येथील तलाव परिसरातील पठारावर झाल्याचे लोकांना माहिती होताच लोकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. हेलिकॉप्टर मधील पायलट व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. हवामानामध्ये सुधार झाल्यानंतर हेलिकॉप्टर रायपूर कडे उड्डाण करेल अशी माहिती पवनी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


Post a Comment