पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.. पोलीस विभागात मोठी शोककळा

विदर्भ दखल न्यूज 
नागपूर 


नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल (वय अंदाजे 40 वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 15 ऑगस्ट 2026) घडली. या घटनेमुळे नागपूर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झोल हे अर्ज/संबंधित शाखेत कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. झोल यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. आत्महत्ये मागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
अंत्यसंस्कार

शनिवार (दि. 16 ऑगस्ट 2026) दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल
पोलिस आयुक्तांचे वकव्य

"ज्ञानेश्वर झोल यांच्या निधनाने नागपूर पोलिस दलाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही संपूर्ण मदत करून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल."

डॉ. रवींद्रकुमार सिंघल पोलिस आयुक्त, नागपूर

कारण अद्याप अस्पष्ट


आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कुटुंबीय, सहकारी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विधाने नोंदविण्यात येत आहेत. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
पोलिस दलात शोककळा

झानेश्वर झोल हे कर्तव्यदक्ष

अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सहकारी अधिकारी आणि कर्मचान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

शासनस्तरावरून कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि इतर आवश्यक ती मदत करण्यांचे आश्वासन देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments