विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पुराडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी निलेश जंजाळकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता व स्वतःच्या मर्जीने कामे केल्याचा ठपका ठेवत चौकशी अंती त्यांना निलंबित केले आहे.
निलंबित करण्यामागचे कारण
1)Jem पोर्टल वर खरेदी न करणे
2)अर्थसंकल्पीय तरतूद शिवाय व तरतुदीपेक्षा नियम बाहेर जादा खर्च करणे
3) खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी साठा पंजिला न घेणे व कायदेशीर विनियोग दाखविला नाही
4) 14 व 15 वित्त आयोग अंतर्गत विविध बांधकामांमध्ये अंदाजपत्रकामध्ये जादाचे मूल्यांकन दाखवून शासकीय निधीच्या नुकसान करणे
5) देयके प्रदान करण्यापूर्वी कार्यालयीन टिप्पणी व मसुदा चा वापर न करणे व इतर गैरवर्तनाच्या बाबतीत त्यांना निलंबित केल्याचे पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे
निलंबन काळामध्ये यांचे मुख्यालय पंचायत समिती सिरोंचा ठेवण्यात आले असून त्यांना कार्यालय प्रमुखाचे पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशात नमूद आहे .
निलंबन काळात महाराष्ट्र नागरिक सेवा निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून यांच्या काळातील प्रधान नियम 1981 चे नियम 68 मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता अनुदेय राहील असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी आदेशात केला आहे.

Post a Comment