विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली जिल्हा अंतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्ती आश्रम शाळेमध्ये दिनांक 12 ..10 ..2026 सोमवार रोजी दुपारच्या सुमारास शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राणू कृष्णा हलामी राहणार मोहगाव वय 14 वर्ष असे मृतक मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथीलआदिवासी आश्रम शाळा येथे इयत्ता आठवी वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या राणू कृष्णा हलामी वय 14 वर्ष या विद्यार्थिनीने दिनांक 12..9..2026 सोमवार रोजी अंदाजे दुपारी 3 वाजेच्या सुमारास शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
. . सदर विद्यार्थिनीने एवढे मोठे टोकाचे पावूल का? म्हणून उचलले असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.तपासा अंती कळून येईल घटनास्थळावर कुरखेडा पोलीस दाखल झाले असून मृतक विद्यार्थिनीचा पंचनामा व पुढील प्रक्रिया सुरू असल्याची. माहिती मिळाली आहे.

Post a Comment