विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी
पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डार्ली शिरसी जंगल परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे .वनविभागाच्या माहितीनुसार वनविभागाने काही ठिकाणी जंगल परिसरात वाघाच्या हालचाली टिपण्याकरिता कॅमेरे बसवण्यात आले होते त्या कॅमेरामध्ये वाघाच्या हालचाली दिसून आलेले आहेत त्यामुळे परिसरातील गावातील लोकांनी जंगलात जात असताना घोळक्याने जावे आणि सावधानी बाळगावी विनाकारण जंगलामध्ये जाऊ नये काही दिवसापूर्वी शिरशी परिसरात एक मादी वाघ व त्याचे पिल्लू रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासधारकांना दिसल्याची माहिती समोर आली होती आणि सध्याच्या घडीला जंगली हत्तीचे मार्गक्रमण जंगलातून व जंगला लगत असलेल्या शेतातून होत असल्याने लोकांनी जंगलात जाताना सावधानी बाळगावी इकडे तिकडे लक्ष देऊन बारकाईने आपले कामे करावी जंगलात शेतकऱ्यांनी सुद्धा शेतावरती जात असताना सावधानी बाळगून जावे शक्यतो सकाळच्या सायंकाळच्या सुमारास शेतावर जाणे टाळावे असे सुद्धा वनविभागाच्या वतीने पोर्ला वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी पंचभाई शिरसी क्षेत्र सहायक समर्थ यांनी जनतेला केले आहे.

Post a Comment