ग्राम अधिकाऱ्यांचा जमाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न.. शिवसेना तालुका प्रमुखाची पोलिसात तक्रार..


विदर्भ दखल न्यूज 
चंद्रपूर ब्युरो 


 ग्रामपंचायतींच्या कारभारातील कथित अनियमितता व गैरप्रकारांविरोधात तक्रारी करणारे शिवसेना शिंदे गटाचे चिमूर तालुकाप्रमुख विलास डांगे यांच्याशी पंचायत समिती परिसरात वाद घालून त्यानंतर २५ ते ३० ग्राम अधिकारी एकत्र आले. त्यांनी शिवीगाळ करीत  अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तसेच आपल्याला लक्ष्य करून दहशत  निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा  गंभीर आरोप डांगे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई  करावी आणि संरक्षण द्यावे, अशी  मागणी केली आहे. डांगे यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (६  ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजेचा सुमारास ते माहितीच्या  अधिकारांतर्गत माहिती  मिळिवण्यासाठी तसेच विविध  प्रकरणांबाबत तक्रारी करण्यासाठी  चिमूर पंचायत समिती कार्यालयात  गेले होते. त्यांच्यासोबत दीपक दुधे डॉ. हेही उपस्थित होते. काजळसर व . मोठेगाव येथील विविध विषयांबाबत

दुधे यांनीही तक्रार केली होती. गटविकास अधिकारी सुभाष बांदुरकर यांच्या दालनात भेट घेऊन संबंधित विषयांवर चर्चा केल्यानंतर चौकशी करण्याचे आश्वासन मिळाल्याचे डांगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर ते विस्तार अधिकारी उघडे यांच्या दालनात गेले. यावेळी त्यांनी पाच ते सहा पत्रे दिली. त्या ठिकाणी ग्राम अधिकारी उमेश विंचूरकर उपस्थित होते. त्यांनी वैयक्तिक बाबींवरून डांगे यांच्याशी वाद घालत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच डांगे हे कार्यालयाबाहेर पडले. त्यांच्यासोबत दीपक दुधेही बाहेर आले. पंचायत समितीच्या गेटजवळ आल्यानंतर अचानक सुमारे २५ ते ३० ग्राम अधिकारी एकत्र जमले. त्यांनी शिवीगाळ करीत अंगावर येण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. जमावाच्या आक्रमक पवित्र्यामुळे घाबरून मोटारसायकलवरून तेथून निघून गेल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारींमुळे दबाव आणल्याचा आरोप

ग्रामपंचायतींच्या कामकाजातील कथित अनियमितता, निधीचा वापर आणि प्रशासकीय बाबींविषयी आपण सातत्याने प्रश्न उपस्थित करून संबंधित ग्राम अधिकाऱ्यांविरुद्ध लेखी तसेच ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. काही प्रकरणे लोकायुक्त, मुंबई यांच्या कार्यालयातही सुरू असल्याचा दावा डांगे यांनी केला आहे. आपल्या तक्रारींमुळे काही ग्राम अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव गेल्याचे आणि काही प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यावर कारवाई होण्याची भीती काही ग्राम अधिकाऱ्यांना असल्याने आपल्याविरोधात जमाव करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर येण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप डांगे यांनी केला आहे.
अनेक ग्राम अधिकाऱ्यांची नावे तक्रारीत

डांगे यांच्या तक्रारीत केशव गजमे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आनंद देवगडे, प्रविण उंदीरवाडे, राजेश कांबळे, समर्थ उराडे, भाग्यवान शेन्डे, संजय ठाकरे, हरिहर बोले, संजय ढोणे, दिनेश राठोर, प्रतिभा किन्नाके, विवेक तितरे, आकाश कवाडे, विठूल नखाते यांच्यासह अन्य ग्राम अधिकारी उपस्थित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करून तक्रारीतील आप्पांची पडताळणी करावी, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारा कराती आणि आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी डांगे यांनी चिमूरकडे केली आहे. दरम्यान, पंचायत समिती परिसरातील या प्रकारामुळे शही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोग याच्या तक्रारीतील आरोपांची पोलिस चौकशीतून सत्यता स्पष्ट होणार असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, यापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments