शेतात आढळला वृद्धाचा मृतदेह अन् उडाली मोठी एकच खळबळ...


विदर्भ दखल न्यूज 
कुरखेडा 

कुरखेडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या  तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी नामक मनीराम नैताम वय 65 वर्ष या इसमाचा मृतदेह शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास गाव परिसरातील लगतच्या शेतामध्ये आढळूनआल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 


प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरनोली येथील रहिवासी मणिराम नैताम हा काही दिवसापासून बेपत्ता होता कुटुंबीयांनी मनीराम याचा इतरत्र शोध घेतला असता कुठेही त्याचा पत्ता लागला नाही .


 यामुळे त्याच्या घरच्या कुटुंबीयांनी मनीराम बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली होती मात्र अशातच शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास  त्याचा मृतदेह शेतात आढळून आला मनीराम हा मानसिक आजाराने ग्रस्त होता अशी माहिती मिळाली आहे . 

घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना मिळताच पोलिस पाटलांनी ठाण्याला माहिती दिली पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचा पंचनामा करून मृतकाचे शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले असल्याची माहिती आहे सदर घटनेमुळे  नागरिकाकडून हळूहळू व्यक्त होत आहे 



मनीराम याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे कुरखेडा पोलीस  घटनेचा तपास करीत आहे मनीराम याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र तपासा अंती समोर येणार आहे.

0/Post a Comment/Comments