विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -मुनिश्वर बोरकर
देसाइगंज -देसाईगंज शहरातिल मुख्य बाजारपेठेत सह तालुक्यातिल विविध गावांत सट्टापट्टी व्यवसायाला मोठे उथान आले आहे ही बाब लक्षात येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज चे ठाणेदार स्वप्निल इजप्पवार यांनी गंभिर दखल घेत कार्यवाहीचा सपाटा सुरु केला. आज केलेल्या कार्यवाहीत तब्बर ११ सट्टा व्यवसायीकांना जेरबंद केल्याने सट्टा व्यवसायीकांचे धाबे दणानले.
सविस्तर वृत्त असे की देसाईगंज शहरात मुख्य बाजारवाडीत टिनांचे शेड उभारुन सट्टा व्यवसायीक सट्टापट्टी चा व्यवसाय करत आहेत अशी माहिती प्राप्त होताच नव्याने रुजू झालेले पोलीस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांनी थेट व्यवसायीक स्थळी जाऊन कार्यवाही करत सट्टा व्यवसाय करणाऱ्या प्रदिप साहु देसाईगंज पुंडलिक वाघाडे विसोरा बिसेन प्रधान नैनपुर विदुश्वर मेश्राम विर्शी गणेश झिलपे शिवराजपुर राजकुमार पराते दे .गंज सर्वजित चंदनगिरी नविन लाडज सचिन धाकडे विसोरा सुनिल कुथे आमगांव हिवराज नंदेश्वर पिंपळगाव ता. ब्रम्हपुरी सोनु उर्फ अल्लाउद्दीन पठाण राहणार देसाईगंज अश्या ११ सट्टापट्टी व्यवसायाीकांना अप क्र ४९९/२०२६ कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कार्यवाही करुन तब्बल ११७७४० रुपयाचा मद्देमाल जप्त कले या जप्तिमध्ये नगद रोख रक्कम मेस्ट्रो दुचाकी स्कुटी सट्टापट्टी लिहिण्याचे छापिल बूक पेन कार्बन लोखंडी स्टॅंड कुलर पंखा पाणि पिण्याचे जार असे सर्व साहित्य जप्त केल्याने सट्टा व्यवसायीकांचे धाबे दनाणले आहेतः

Post a Comment