विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठान सोहळा राबविण्यात येत असतो यावर्षीचा प्रतिष्ठान सन्मान सोहळा नागपूर येथे 23 ऑगस्ट रजवाडा पॅलेस गांधीसागर नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे या शानदार प्रतिष्ठान सन्मान सोहळ्यात आरमोरी येथील सोनार समाजातील शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या 8 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचं सत्कार सोनार प्रतिष्ठान च्या वतीने होणार आहे, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार निमित्याने विद्यार्थी आणि पालक संस्थेचे संस्थापक, व पदाधिकारी पुरुषोत्तमजी कावळे, आणि गडचिरोली जिल्हाध्यक्ष दिलीप हाडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment