विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे रात्रीच्या सुमारास घराच्या सुरक्षा करिता घरासमोर लावलेला गेट तोडून हत्तीने चक्क घरात प्रवेश केला यामुळे घरातील लोकांमध्ये एकच तारांबळ उडाली घरातील लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर आश्रय घेऊन लगेच वनविभाग व परिसरात आजूबाजूच्या लोकांना हत्तीची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड जंगल परिसरात जवळपास आठ दिवसापासून हत्तीने आपला ठिय्या मांडला आहे काही शेतकऱ्यांचे शेतातील पऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे अशातच रात्रीचे सुमारास वैरागड येथील आकरे कुटुंबीयांच्या घरांमध्ये घराच्या सुरक्षा करिता लावलेला गेट तोडून घरात प्रवेश केला यामुळे कुटुंब भयभीत झाले लगेच त्यांनी वनविभाग व आजूबाजूच्या लोकांना फोन केला लोकांची गर्दी जमली लगेच घटनास्थळी वनविभाग दाखल झाले मात्र तोपर्यंत हत्ती तिथून निघून गेला होता. जंगली हत्ती मुळे गाव व शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे गावाच्या लगत जंगल लागून असल्याने शेती शिवार लागून असल्याने आता हत्ती जंगल शिवारातून गावांमध्ये येऊ लागल्याने नागरिकां मध्ये मोठी दहशत हत्तीची निर्माण झाली आहे जंगली हत्तीचा बंदोबस्त लावावा अशी आता मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली लागली आहे . जंगली हत्तीवर नियंत्रण ठेवण्याकरिता वन क्षेत्र सहाय्यक सतीश गजबे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक धात्रक,कुमरे व वन विभागाची टीम लक्ष ठेवून आहे.

Post a Comment