ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने NCM C कार्ड शिबिराचे आयोजन.. नागरिकांचा समाजभान जपणारा उपक्रम.. संस्था सचिव प्रभाकर कुबडे

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


समाजॠणाची परतफेड म्हणुन जेष्ठ नागरिक संस्था तालुका व जिल्हा गडचिरोलीचे वतीने दि.19.7.2026 रोजी सकाळी 10ते 3 वाजे दरम्यान कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे एस.टी.प्रवास सवलतीचे NCMC कार्ड काढण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या समाजोपयोगी शिबिराचे आयोजनातुन जेष्ठ नागरिक सुध्दा सामाजाचे ऋण फेडण्यासाठी तत्पर आहेत हे दिसुन आले.
शिबिरात एकुण 129 जेष्ठ नागरिक व महिला यांनी शिबिराचा लाभ घेऊन आपले NCMC कार्ड काढुन घेतले.


जेष्ठ नागरिकांनी आयोजित केलेल्या या समाजभान जपणा-या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिक संस्था तालुका गडचिरोलीचे अध्यक्ष एच.ए.पठाण,सचिव प्रभाकर कुबडे ,उपाध्यक्ष उमेश आखाडे,कोषाध्यक्ष जयदेव चिचघरे,यांनी परिश्रम घेतले.सोबतच सदर उपक्रमासाठी जिल्हा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर,सचिव सुधाकर बावणे. दिलीप आखाडे,पुरुषोत्तम म्हस्के,दादाजी चुधरी ,शरदपाटिल ब्राम्हणवाडे यांचे सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments