विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर
तेलंगणा राज्यात शेतमजुरीचे काम करण्यासाठी गेलेल्या चार मजुराचा अपघातामध्ये दुर्दैव मृत्यू मृतक मजूर
सिंदेवाही तालुक्यातील
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील बऱ्याचशा प्रमाणात काही मजूर शेतमजुरीचे काम करण्याकरिता तेलंगाना राज्यांमध्ये गेले होते शेतमजुरीचे कामे आटपून आपल्या गावी परत येत असताना तेलंगणा राज्यात tgsrtc बसने मजूर घेऊन येत असणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने
शेतमजुरीचे काम करणाऱ्या पवनाचक गावातील चार मजुराच्या जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे आणि 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना घडल्याने पवनाचक गावावर मोठी शोककळा पसरली आहे परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये मजूर टेम्पो मध्ये बसले होते आणि टेम्पो मधील काही मजूर गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना रुग्णालयामध्ये उपचार करण्याकरिता भरती करण्यात आली आहे . घटनेचा तपास स्थानिक पोलीस प्रशासन करीत आहे


Post a Comment