विदर्भ दखल न्यूज.
गडचिरोली
वसा पोर्ला येथील नामे बाळू राऊत अंदाजे वय 50 वर्ष हा दिनांक 23.9.2026 रोजी सकाळच्या सुमारास काही कामा निमित्य जंगलामध्ये गेला होता मात्र सायंकाळचे 5 ते 6 वाजून सुद्धा घरी परत न आल्याने घरच्यांना काही तरी संशय निर्माण झाला आणि लगेच घरच्यांनी इकडे तिकडे शोधाशोध चालू केली. मात्र बाळू राऊत याचा काही पत्ता लागला नाही . लगेच घरच्यांनी गावातील पोलिस पाटील यांना माहिती दिली . पोलिस पाटील यांनी प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने जंगल परिसरात शोध मोहीम चालू केली असता दिनांक 24 ..9..2026 च्या सकाळी सुमारास जंगल परिसरात त्याचे शव आढळून आले अशी माहिती मिळाली आहे सदर मृतक हा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटना स्थळावर वन विभाग व पोलिस विभाग दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे .
मृतकाचे शव पोलिस विभागाने ताब्यात घेऊन शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे
मृतकाचे मागे दोन मुली पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे. बाळू राऊत याचा एकाकी मृत्यू झाल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment