प्रशासनाच्या मुक आशीर्वादाने पोटेगाव येथे दारू विक्री जोमात.... युवा पिढी दारूच्या आधीन प्रशासन लक्ष देणार कधी? ग्रामस्थांचा प्रशासनाला संतापजनक सवाल.. पोलिस अधीक्षक गडचिरोली यांनी लक्ष घालावे..

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


गडचिरोली तालुक्यातील पोलिस मदत केंद्र असलेल्या पोटेगाव येथे बऱ्याच दिवसापासून अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सदर दारू विक्रीमुळे पोटेगाव व परिसरातील युवा पिढी दारूच्या अधीन झाली असून युवा पिढी बरबादीच्या मार्गावर आहे. पोटेगाव येथे दारू विक्रीमुळे महिला व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसते आहे पोटेगाव येथील अवैध दारूविक्री मुळे कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले असून पोटेगाव व परिसरातील युवा पिढी नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. दारू विक्री करणारे मालामाल झाले असून पिणारे मात्र कंगाल बरबाद मृत्यूच्या दारात उभे आहेत
पोटेगाव येथे पोलिस मदत केंद्र असताना सुद्धा खुले आम पने दारू विक्री कशी काय
सुरू आहे आणि दारू विक्रेत्यांना अभय कोण देतोय दारू विक्रेत्यांची एवढी हिम्मत कुणामुळे वाढलीय स्थानिक प्रशासन करतो काय? असा संतापजनक प्रश्न पोटेगाव येथील महिला व सुजाण नागरिकांना पडला आहे. प्रशासनाच्या मुक आशीर्वादाने पोटेगाव येथे दारू विक्री जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस अधीक्षक गडचिरोली यांनी लक्ष घालून पोटेगाव येथील दारू विक्री बंद करून दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी असे आता महिला भगिनी सुजान नागरिकाकडून मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments