बनावट स्वाक्षरी व शिक्का बनवून दिला नोकरीची नियुक्ती. आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तिघाकडून ५ लाख ४० हजाराची केली फसवणुक.

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
 संपादक 


गडचिरोली - राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख ४० हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर गडचिरोली पोलिसांत गुन्हा दाखल केला
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत विविध पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून खोटे नियुक्ती आदेश देणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​घटनेची पार्श्वभूमी व हकीगत:
'जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक' यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



​माहे सप्टेंबर २०२५ ते दिनांक ०५/०७/२०२६ दरम्यान, आरोपी १) देवानंद बापुजी उराडे (वय ५५ वर्षे, रा. इंदिरानगर, गडचिरोली) आणि २) राकेश प्रमोद मुंगेलवार (वय २९ वर्षे, रा. न्यू बुद्धीस्ट कॉन्व्हेंट स्कूलजवळ, कॅम्प एरिया, गडचिरोली) यांनी संगनमत करून सुजाता रमेश बारशिंगे (रा. महागावबोरी, जि. गोंदिया), श्वेता देवराव उसेंडी (रा. येरकड, ता. धानोरा) आणि प्रगती अंबादास वैरागडे (रा. नवेगाव, जि. गडचिरोली) यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात अनुक्रमे सफाई कामगार, कक्ष सहाय्यक आणि जी.एन.एम. (GNM) या पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले देऊन चांच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये लुबाडले.
​बनावट नियुक्ती पत्रांद्वारे फसवणूक:
आरोपींनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या स्कॅन केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यांनी वरील उमेदवारांकडून एकत्रित ५ लाख ४० हजार रुपये (रोख व ऑनलाईन स्वरूपात) उकळले आणि त्यांना कार्यालयाचे खोटे व बनावट नियुक्ती आदेश देऊन त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. अश्या भामट्या पासुन नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांनी केले.

0/Post a Comment/Comments