आरमोरी शहरातील रामसागर तलाव दुर्गंधी घाणीच्या विळख्यात नगरपरिषद लक्ष देणार कधी? आरमोरी शहरवासीयांचा नगरपरिषद प्रशासनाला संत्रप्त सवाल..

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 

                          (फाईल फोटो)
 आरमोरी शहरातील ऐतिहासिक व धार्मिक च्या दृष्टीने रामसागर तलावाला मोठा वारसा लाभलेला आहे मात्र रामसागर तलाव सध्याच्या घडीला दुर्गंधी व घाणीच्या विळख्यात सापडले आहे या तलावाकडे नगरपरिषद प्रशासन लक्ष देणार कधी?असा प्रश्न सध्याच्या घडीला आरमोरी वासियांकडून उपस्थित होत आहे.रामसागर तलावाच्या ठिकाणी केर कचरा व घाण पसरल्याचे दिसत आहे.राम सागर तलावाजवळ राम मंदिर दुर्गा मंदिर तसेच पुरातकालीन किल्ला असल्यामुळे हा परिसर धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो मात्र या तलावाच्या काठावर कचऱ्याची घाण पसरल्याने आणि प्लास्टिक कचरा न कुजणारा बऱ्याचशा प्रमाणामध्ये तिथे जमा झाल्याने आणि काही उघड्यावर शौचास तलाव काठावर होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तलावातील पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दूषित झाले असल्याने परिसरात आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होत आहे नगरपरिषद परिषद मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष देणार कधी? असा संत्रप्त सवाल शहर वासियांकडून उपस्थित होत आहे. रामसागर तलावाची नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आरमोरी शहर वासियांकडून मागणीरूपी बोलले जात आहे. 

0/Post a Comment/Comments