विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोलीच्या सुपुत्राला पश्चिम बंगालमध्ये वीरमरण
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील बीएसएफ जवान सुरेश दुर्गुची आंबाडार वय 35 वर्ष हे पश्चिम बंगाल मध्ये कर्तव्यावर असताना सीमा घुसखोरी दहशवादी यांचे विरोधात कर्तव्य पार पाडत असताना त्यांना वीर मरण आले सध्याच्या घडीला बांगलादेश भारत सीमेवर बांगलादेश घुसखोर दहशतवादी घुसखोरी करीत असल्याने सीमेवर सरकारच्या वतीने मोठी सुरक्षा गस्त तैनात करण्यात आली आहे यामध्ये बीएसएफ मिलिटरी यांचे जवान रात्र दिवस कार्य करीत आहेत भारत बांगलादेश सीमेवर घुसखोर दहशतवादी यांनी केलेल्या गोळीबारात कुरखेडा येथील बीएसएफ जवान सुरेश आंबाडार हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना विरमरण आले सुरेश आंबडार यांचे वीरमरण देशासाठी सुपूर्द ठरले असून त्यांचे कार्य कधीही वाया जाणार नाही
विदर्भ दखल न्यूज टीम कडून
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुरेश आंबाडार अमर रहे अमर रहे

Post a Comment