विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज
*दिनांक: २३ जुलै २०२६*
देसाईगंज:--- भारतीय जनता पार्टी, तालुका देसाईगंज यांच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. कृष्णाभाऊ गजबे यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा महोत्सव २०२६' अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सिंधू भवन, देसाईगंज येथे आयोजित कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबिरात २९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान देसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक बाळकृष्ण माडूरवार यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे तथा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, नगराध्यक्ष लताताई सौंदरकर, नगर उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, भाजप तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, ज्येष्ठ नेते मुरलीधरजी सौंदरकर, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री प्रीतीताई शंभरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या रोशनीताई पारधी, नगरसेवक भाविआ साधवानी, विलास लोखंडे, बाळकृष्ण माडूरवार, नगरसेविका भारतीताई कुथे, ज्योत्स्नाताई लुटे, पल्लवी मेंढे, राहुल सतवाणी, वसंता दोनाडकर, योगेश नाकतोडे, माणिक बनसोड, दीपक झरकर, भास्कर बनसोड, दुबे महाराज, श्यामा अलोने, चरकद्रधर नाकाडे, प्रमोद झिल्पे, शंकर पारधी, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, हेमंत दुणेदार, कुलदीप आम्ले, अतुल दुणेदार, अनु साधवानी, रोशन ठाकरे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेचा संदेश देणारे हे उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरले असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment