चार चाकी वाहनाने दिली दुचाकीला जोरदार धडक.. चार चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ..

विदर्भ दखल न्यूज
आरमोरी/वैरागड

 वैरागड ते रांगी मुख्य मार्गावर लोहारा टी पॉईंट जवळील तलावाजवळ मुख्य रस्त्यावर वैरागड वरून रांगिकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाने रांगी मार्गे वैरागड कडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 19 ..8..2026 बुधवार रोजी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार विहीरगाव येथील नानाजी अलाम राशन दुकानदार हे आपल्या पत्नीसमवेत वैरागड येथे काही







 कामाकरिता दुचाकीने जात असताना लोहारा टी पॉईंट जवळील तलावाजवळ मुख्य मार्गावर वैरागड कडून रांगीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्यांच्या दुसाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्या धडकेमध्ये त्यांचा एका पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना लक्षात येताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.दुचाकीला धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी समय सूचकतादाखवत विहिरगाव येथे फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्या चार चाकी वाहनाला अडवले अशी माहिती मिळाली आहे. चार चाकी वाहन धारकाच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे .घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत

0/Post a Comment/Comments