विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
(फाईल फोटो)आरमोरी आरमोरी तालुक्यातील वैरागड जंगल लगत शेती परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे वैरागड येथील बावनकर नामक शेतकऱ्यांच्या बैलावरती वाघाने हल्ला करून बैलाला जखमी केल्याची घटना गुरुवार दिवशी घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. जंगलगत काही प्रमाणात शेती असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. नेहमीप्रमाणे वैरागड येथील गुराखी हे जंगलामध्ये गुरे चारण्याकरिता घेऊन गेले असता जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने बावनकर यांच्या बैलावरती हल्ला चढविला या वाघाच्या हल्ल्यात बावनकर यांचा बैल जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती वनविभाग वैरागड यांना देण्यात आली असता वैरागर क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सतीश गजबे वनरक्षक ढोलणे आदींनी घटनास्थळावर जाऊन जखमी बैलाचा पंचनामा केला जंगला लगत काही शेती असल्याने शेतकऱ्यांनी शेतावरती जातांना सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Post a Comment