विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशयाने दुर्दैवी मृत्यू शाळा व्यवस्थापन झोपत होते काय? पालक व जनतेकडून उपस्थित होते आहे गंभीर प्रश्न...
धानोरा तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतील 9..8. 2026 रोजी आदिवासी दिनी शाळेतील विद्यार्थिनी झोपेमध्ये असताना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याचि धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रम शाळेत घडली आहे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासोबतच जिल्ह्यामध्ये मोठा हा हा कार उडाला आहे ।
मिळालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे से आदिवासी आश्रम शाळा आहे सदर शाळा कोवासे यांच्या व्यवस्थापनामध्ये चालत असल्याचे बोलले जात आहे शाळेतील विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले असताना 9..8. 2026 च्या रात्री आदिवासी दिनी रात्रीचे सुमारास विषारी सापाने झोपेमध्ये असलेल्या मुलींना दंश केला याची माहिती सकाळी उशिरा शाळेतील कर्मचाऱ्यांना हि बाब लक्षात येताच सदर मुलींना शाळा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी धानोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारकारिता नेले मात्र प्रकृती अति गंभीर असल्याने मूलीना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये भरती करण्यकरिता नेल असताना डॉक्टरांनी तीन मुलींना तपासांती मृत्यू घोषित केले काही मुलीवर उपचार सुरू असल्याचे माहिती मिळाली आहे। सदर घटनेने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे मुलींच्या पालकांना माहीत होताच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णांमध्ये धाव घेतली आणि एकच टाहो फोडला पोटाच्या गोळ्याला शिक्षणासाठी निवासी विद्यार्थिनी आश्रम शाळेमध्ये टाकले शाळा व्यवस्थापनावरती विश्वास टाकून शाळेमध्ये पाठविले शेवटी पालकांच्या हाती काय? आले.. पोटच्या गोळ्याचे दुर्दैवी मरण.घडलेल्या घटनेवरून पालकांचा जीव काय लगत असेल.मात्र या घटनेवरून असे लक्षात येते की शाळा व्यवस्थापनाची निष्काळजीपणा .शाळा व्यवस्थापन काय? करत होते शाळा व्यवस्थापनाचा शाळेतील ढिसाळ व्यवस्थापन .रात्रीचे सुमारास महिला अधीक्षक काय? करत होत्या.. शाळेच्या सभोवताल केर कचरा साफ होता काय?. पावसाळ्याच्या दिवसात साप प्रतिबंधक काही उपाययोजन केले काय?असे अनेक प्रश्न जनतेकडून उपस्थित होऊ लागले आहेत. आश्रमशाळे मध्ये घडलेल्या घटनेवरून पूर्णतः जिल्हा हादरला आहे शाळा कर्मचाऱ्यावर मनुषवदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आता जिल्यातील जनतेकडून बोलले जात आहे.

Post a Comment