विदर्भ दखल न्यूज
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
गडचिरोली
आरमोरी तालुक्यातील गणेशपुर शिरसी शेती परिसरात दिनांक 14. 9 ..2026 सोमवारच्या रात्री सुमारास गणेश पूर शिरशी शेती शिवारात जंगली हत्तीने रात्रीच्या सुमारास शिरकाव करून गर्भावस्थेत असलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कसाबसा पैशाची जुळवाजुळव करून यावर्षी चालू हंगामात धान्याचा पिक उभा केला मात्र ऐन धान्य पीक गर्भावस्थेत आल्यावर जंगली हत्तीच्या कडपाने धान्य पिकांमध्ये शिरकाव करून धान्य पिक तुडवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जवळपास तीन चार वर्षापासून शेतकऱ्यांना जंगली हत्तीकडुन होणारे शेती पिकाचे नुकसान सोसावे लागत आहे. सदर नुकसानीची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णा भाऊ गजबे यांना लागताच त्यांनी तातडीने गणेशपुर येथे शेती बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित वन विभागाला पंचनामाचे आदेश दिले आणि शेतकऱ्यांना धीर दिला.
शेतकऱ्यावरती सध्याच्या घडीला तुडतुडा, करपा, खोडकिडा या रोगाचे आक्रमण धान्य पिकावर वाढल्याने शेतकऱ्याची अवस्था बिकट असताना जंगली हत्तीच्या उपद्रव्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर झाली आहे. यामुळे पूर्णतः शेतकरी खतलेल्या अवस्थेत दिसत आहे.
वनविभागाने संबंधित घटनेची तातडीने दखल घेऊन हत्तीच्या बंदोबस्त करिता योग्य त्या उपाययोजना कराव्या असे शेतकरी वर्गातून बोलले जाऊ लागले आहे.
माजी आमदार कृष्णा भाऊ गजबे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येऊन जंगली हत्तीकडुन धान्य पिकाची झालेल्या नुकसानीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नुकसान पाहणी दरम्यान मा.आमदार गजबे यांचे समेत ईश्र्वरजी पासेवार सभापती बाजार समिती आरमोरी मंगेश चापले दिनेश बनकर (पत्रकार) गणेशपुर शिरसी येथील शेतकरी वनविभागाचे क्षेत्र सहायक समर्थ वाळकेजी वनरक्षक दोडकेजी वनरक्षक टोंगेजी वनरक्षक आंबेडोरे वनरक्षक आदींची उपस्थिती होती.

Post a Comment