विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
कुरखेडा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी डी बी उराडे यांनी कुरखेडा तालुक्यातील 17ग्रामपंचायती मध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार व सावलखेडा ग्रामपंचायतचे सरपंच यांचे विरोधात ग्रामपंचायत मध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने आणि सरपंचावर कार्यवाही झाली संबंधाने कुरखेडा तालुक्यातील सरपंच संघटना गेल्या सात ते आठ दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. सरपंच संघटनेची सहाय्यक BDO उराडे यांना पंचायत समिती मधून स्थानांतरण करा अशी मागणी आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून सरपंच संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू असताना कोणत्याही हालचाली सुरू न झाल्याने आणि आंदोलनाची दखल झाली नसल्या कारणाने आज बुधवारपासून सरपंच संघटनेच्या वतीने उपोषणाला नवी दिशा म्हणून आमरण उपोषण करण्याचा निर्धार सरपंच संघटनेने केलेला आहे. सात ते आठ दिवसापासून सरपंच संघटनेचे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने सरपंचाच्या मागणीचे "दखल, घेऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सरपंच संघटनेच्या वतीने प्रतिनिधीशी वार्तालाप करताना सांगण्यात आले आहे. मात्र.. "निरर्थक ,निराधार' आरोप लावून सावलखेडा येथील सरपंचाची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये करून त्यांच्यावर तक्रार दाखल करून नाहक सरपंचाला मानसिक त्रास देण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सुद्धा सरपंच संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे यांनी तालुक्यातील अंदाजे 17 ग्रामपंचायती मध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याची तक्रार केल्या कारणाने सरपंच संघटनेने आंदोलनाचा पवित्रा उपोषणाचा पवित्रा उभारलेला आहे मात्र प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन व चौकशी समिती नेमून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी असे सुद्धा सरपंच संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. .
सरपंच संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्धार आजपासून सुरू होत असल्याने कुरखेडा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे यांचे स्थानांतरण खरच..! होणार काय? याकडे संपूर्ण जिल्हावाशीयांचे आता लक्ष लागून आहे.
Post a Comment