विदर्भ दखल न्यूज
प्रतिनिधी : दिलीप अहिनवे
(मुंबई व ठाणे जिल्हा)
शहापूर, दि. ४ : मुंबई महापालिका नगरबाह्य तानसा मनपा उ. प्रा. शाळेत कार्यरत असलेले प्रशिक्षक सुरेश साळुंखे हे १ एप्रिल रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने तानसा जल विभागाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मुंबई महापालिका जल विभागाचे मुख्य अभियंता अंकुश भोईर, मनपा वैद्यकीय अधिकारी सुनिल गेडाम, मनपा शिक्षण विभागाचे अधीक्षक नंदु घारे, सहाय्यक अभियंता गणेश लिखार, विभाग निरीक्षक रमेश अडगाळे व तानसा शाळेचे मुख्याध्यापक सुनील पटारे उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सत्कारमूर्ती सुरेश साळुंखे यांच्या कार्याचा गौरव केला.
महाराष्ट्र राज्याचे बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुखदेव मोहिते, ठाणे जिल्हा मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद मुख्याध्यापक नवनाथ पवार, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक चिकणे सर, सातारा जिल्हा बेलदार समाजाचे समाजसेवक दिलीप चव्हाण, एस. टी. महामंडळाचे संघटक कैलास चव्हाण, जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राज चौधरी (माजी विद्यार्थी) यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
सुरेश साळुंखे यांचे वडील संतु हे ठेकेदार होते व आई रेऊबाई गृहिणी होती. सुरेश यांचा जन्म मोडकसागर येथे झाला. प्रल्हाद, आबा, श्याम, सुरेश व सुलोचना अशी ही पाच भावंडे. सुरेशचे प्राथमिक शिक्षण मोडकसागर महापालिका शाळेत झाले. पुढे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण भा. ल. सदगीर या माध्यमिक शाळेत झाले. डी. एड. पुर्ण झाल्यावर ज्या शाळेत शिकले त्याच भा. ल. सदगीर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या शाळेत एक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्यानंतर शहापूर येथे जिल्हा परिषद शाळेत तीन वर्षे काम केले.
मुंबई महापालिकेत ८ जानेवारी १९९२ मध्ये कांजूरमार्ग येथील डॉकयार्ड कॉलनी शाळेत रुजू झाले. त्यानंतर टागोरनगर मराठी शाळा क्र.३, मोडकसागर, तानसा व गोशाळा अशा अनेक शाळांमध्ये उत्तमरीत्या अध्यापनाचे कार्य केले. महापालिकेत ३४ वर्षे ३ महिने सेवा केली. या कालावधीत त्यांनी अनेक पूरस्कार पटकावले. आज त्यांचे कित्येक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत.
त्यांची पत्नी सविता एक उत्तम गृहिणी आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. मोठी मुलगी शितल मेकॅनिकल इंजिनिअर आहे. जावई गणेश देखील इंजिनिअर असून त्यांना मितिषा व मितांश अशी दोन अपत्ये आहेत. दोन नंबरची मुलगी कोमल ही देखील इंजिनिअर आहे. जावई प्रतिक देखील इंजिनिअर आहेत. त्यांना प्रियांश नावाचा मुलगा आहे. दोन्हीही मुली व जावई उच्चशिक्षित असून सुखाने नांदत आहेत. मुलगा पुष्कराज हा देखील सिव्हिल इंजिनिअर असून तो सॅमसंग कंपनीत कार्यरत आहे. शाळेतील मुलांना घडवता घडवता पत्नीच्या मदतीने स्वतःच्या मुलांचे भवितव्य देखील सुरक्षित केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य लिपिक पष्टे व त्यांचे कार्यालयीन सहकारी, प्रशिक्षक जयराम पाटील, कैलास चौधरी, धांडे, तुकाराम निपुर्ते, डाटा ऑपरेटर चित्रा रहाटे, बालवाडी शिक्षिका राधिका रेंजड, कर्मचारी रुपाली पाटील, बी. व्ही. जी. कर्मचारी गणेश मोरे, शैलेश सुतार, ज्योत्स्ना म्हस्कर, योगिता दळवी, कार्यादेश (फोरमन) राजेंद्र भराडे व ठकसेन चेन्ने व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानसा शाळेचे मुख्याध्यापक सुनील पटारे यांनी केले. सुत्रसंचालन प्रशिक्षक तुकाराम निपुर्ते यांनी तर शेवटी सर्वांचे आभार प्रशिक्षक विनोद रोकडे यांनी मानले.


Post a Comment