मानव मंदिर गडचिरोली येथे. महान त्यागी बाबा जुमदेवजी जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न...

विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली 



परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक 3..4...2026 शुक्रवार रोजी मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्सव  मानव मंदिर गडचिरोली येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज्य परमात्मक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली उद्घाटक म्हणून गोविंदरावजी दोनाडकर सर्वेसर्वा परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देवरावजी होळी मा. आमदार गडचिरोली सौ प्रणोती निंबोरकर नगराध्यक्ष गडचिरोली महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे




 जिल्हाप्रमुख काँग्रेस गडचिरोली सागर निंबोरकर नगरसेवक गडचिरोली हर्षल गेडाम सभापती शिक्षण नगरपरिषद गडचिरोली पराग पोरेड्डीवार नगरसेवक गडचिरोली मनीषा खेवले नगरसेविका गडचिरोली शिल्पा हेमके नगरसेविका गडचिरोली फाल्गुनजी मानकर संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली गुणवंतजी फटे मार्गदर्शक माणिकजी मानकर मार्गदर्शक रमेशजी वकेकर संचालक अमरजी चट्टे मार्गदर्शक रवींद्रजी कांबळी मार्गदर्शक विठ्ठलजी राऊत मार्गदर्शक आरमोरी वनमाळीजी डोंगरवार मार्गदर्शक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. जयंती उत्सवाच्या निमित्ताने मानव मंदिर गडचिरोली येथे अंधश्रद्धा स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती हुंडाबळी आदि विषयावर झाकीचे प्रदर्शन दाखवून सामाजिक जनजागृती करण्यात आली




 गडचिरोली येथील संविधान चौकापासून ते गांधी चौक मार्गे गडचिरोली शहरातून आरमोरी रोड मार्गे मानव मंदिर पर्यंत शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून मानवतेचा संदेश देण्यात आला. परमपूज्य परमात्म एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोलीच्या वतीने जयंती उत्सव मानव मंदिर स्थळी मानव धर्मावर आधारित युवक युवतींचे महिलांचे नृत्य सुद्धा घेण्यात आले जयंती उत्सवाच्या निमित्ताने मानवधर्मातील इयत्ता दहावी बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त गुण संपादन केलेल्या आणि शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या युवक युवतींचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गडचिरोली नगरपरिषद येथे नवनियुक्त नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष सह नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख काँग्रेसचे महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे यांचा सुद्धा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया छत्तीसगड आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येने सेवक सेविका बालगोपाल यांची मानव मंदिर गडचिरोली येथे जयंती उत्सवाच्या निमित्ताने उपस्थिती होती.
 बाबा जुमदेवजी यांच्या जयंती उत्सव निमित्ताने गडचिरोली येथे रॅलीच्या माध्यमातून मुलींचे स्त्रियांचे लेझीम नृत्य झाकीच्या माध्यमातून सामाजिक जन जागृतीचे प्रदर्शन शिक्षणाचे महत्व थोर महापुरुषांचे समाजाला लाभलेले योगदान आदी वेशभूषा च्या माध्यमातून दाखविण्यात आले. त्यानंतर मानव धर्मावर आधारित चर्चा बैठक घेण्यात आली. चर्चा बैठकीमध्ये मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांनी दिलेले चार तत्त्व तीन शब्द पाच नियम या आधारावर चर्चा बैठक पार पडली मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या जयंती पर्वावर त्यांच्या जीवन

 चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थित सेवक सेविका बाल सेवक यांना मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांचे समाजाला लाभलेले महत्त्व विशद करण्यात आले चर्चा बैठकीची सुरुवात सृष्टीचे निर्माता बाबा हनुमानजी मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी मातोश्री आई वाराणसी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून विधिवत पूजाअर्चा करून चर्चा बैठकीला सुरुवात करण्यात आली. चर्चा बैठकीमध्ये समाजामध्ये घडणाऱ्या वाईट चालीरीती अंधश्रद्धा हुंडाबळी स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती समाजामध्ये वाढलेले वाईट अत्याचार आदी विषयावर मार्गदर्शन करून उपस्थित सेवक सेविका बालगोपाल यांना मानवधर्मात मानवाने मानवासारखे वागले पाहिजे आणि मानवाने समाजात वावरताना माणुसकीने जगले पाहिजे याकरिता मार्गदर्शनातून उपस्थिित सेवक सेविका यांना प्रोत्साहित करण्यात आले. चर्चा बैठकीचा समारोप मानव धर्माच्या सायंकाळच्या प्रार्थनेणे समारोप करण्यात आला चर्चा बैठकीचे संचालन प्रशांत ठेंगरे सर यांनी केले तर प्रास्ताविक आभार प्रदर्शन अमरजी चट्टे यांनी मानले बाबा जुमदेवजी यांच्या जयंती उत्सव निमित्याने चर्चा बैठकीला हजारोच्या संख्येने सेवक सेविका बालगोपाल यांची उपस्थिती होती बाबा जुमदेेवजी यांच्या जयंती निमित्याने काढलेली रॅली (शोभायात्रा) व झाकी शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेत होती.

0/Post a Comment/Comments