विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
वैरागड
आरमोरी तालुक्यातील वैरागड हे मुख्य परिसरातील जनतेचे
बाजारपेठेचे स्थान आहे आणि या बाजारपेठेला परिसरातील बऱ्यापैकी गावे जोडली आहेत रोजच्या दिनचर्यातील दैनदिन काही महत्वाची कामे करण्याकरिता वैरागड हे स्थान जवळीक असल्याने परिसरातील लोक वैरागड येथे गॅस इंधनापासून तर अन्य कामे करण्याकरिता येत असतात . मात्र वैरागड येथे इंधन गॅसची एजन्सी ही अस्थाई असल्याने नाईलाजाने वैरागड परिसरातील लोकांना कधी कधी गॅस इंधनाचा साठा पुरेसा उपलब्ध राहत नसल्याने कढोली आरमोरी येथून गॅस इंधन आणावा लागतो यामुळे गॅस धारकाना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागतो आणि ग्राहकांचा वेळ सुद्धा वाया जात असतो बऱ्याच वेळ अशी परिस्थिती आल्याचे गॅस धारक सांगतात. गॅस धारकांची समस्या लक्षात घेता वैरागड येथे प्रशासनाने स्थाई स्वरूपाची इंधन गॅस एजन्सी दिली तर ग्राहकांच्या गरजेनुसार इंधनाचा साठा उपलब्ध होईल आणि इंधनाचा पुरवठा सुद्धा पुरेशा प्रमाणात होईल . प्रशासनाने वैरागड येथे स्थायी गॅस एजन्सी देण्यात यावी अशी मागणी वैरागड परिसरातील गॅस धारकाकडून आता जोर धरू लागली आहे .

Post a Comment