प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली
कचारगड - गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन, ध्वजारोहण व गड महारैली मोठ्या उत्साहात सुरु झाली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री मा. प्रा. अशोक उईके, आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कविता गायकवाड SDM देवरी, प्रणय ताराम, अमृता सुतार नायब तहसीलदार सालेकसा, दुर्गादास कोकोडे अध्यक्ष कचारगड महोत्सव कमेटी, शकुंतला परते उपाध्यक्ष कचारगड महोत्सव कमेटी, परमेश्वर उईके कोषाध्यक्ष कचारगड महोत्सव कमेटी, लिना उईके, ब्रिजलाल उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राणी विरांगना दुर्गावती स्मारकाचे पूजन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विधिवत पार पडले. गड महारैली दरम्यान मध्यप्रदेशातील बैतुल येथून आलेल्या आदिवासी वाद्य पथक व आदिवासी समाजबांधवांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात “जय सेवा, जय जोहार, जय गोंडवाना” या घोषणांनी संपूर्ण कचारगड परिसर दुमदुमून सोडला. यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. प्रा. अशोक उईके यांच्या हस्ते दाई काली कंकाली ची विधिवत पूजा करण्यात आली.
पाच दिवस सुरु असलेल्या या राष्ट्रीय महोत्सवात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात व उत्तरप्रदेश आदी राज्यांतील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महाअधिवेशनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची एकता, संस्कृती व परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनामुळे कचारगड पुन्हा एकदा आदिवासी अस्मितेचे केंद्रबिंदू ठरले असून, या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment