महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. मा. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वपक्षीय शोक सभा; आठवणींना उजाळा

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रित्यर्थ गडचिरोली येथे सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन गडचिरोली येथील राजीव गांधी सभागृहात आयोजित करण्यात आली. या सभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शोक सभेत गडचिरोली चे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, काँग्रेस चे नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेस चे जेष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, लोकहीतवाद चे जिल्हाप्रतिनिधी रोहिदास राऊत, काँग्रेस चे प्रदेश महासचिव ऍड. विश्वजित कोवासे, विजय गोरडवार, कविता मडावी, शिवसेना उबाठा चे पवन गेडाम, वासुदेव शेडमाके, गडचिरोली नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोळकर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, रेखा तोडसे, नारिशक्ती च्या अध्यक्षा जयश्री येरमे, लक्ष्मी कन्नाके, प्रकाश ताकसांडे, नितेश राठोड, छाया कुंभारे, शिवसेना शिन्दे गटाचे हेमंत जांबेवार, दीपक भारसाकडे, अरबाज शेख, मनीषा मडावी, नगरसेविका प्रतिभा कुमरे, मधुकर भांडेकर, नगरसेवक रवी मेश्राम, कुसुम आलाम, नगरसेवक बाळू टेम्भूर्णे, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, उपस्थित मान्यवरांनी स्व. मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या. यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधिमंडळातील अनुभव शेअर करत मा. अजितदादा पवार यांच्यासोबत जिल्हा विकासासाठी अनेकवेळा झालेल्या चर्चांची आठवण सांगितली. त्यांनी सांगितले,
*“ते माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे – ‘डॉ. तू सांग, गडचिरोलीसाठी काय लागतं, मी ते पूर्ण करण्याचं 100% प्रयत्न करीन.’”* जनतेशी असलेला थेट संवाद, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि शेतकरी व ग्रामीण भागासाठी घेतलेले ठोस निर्णय याबाबत वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या.
सभेचे प्रास्ताविक नगरपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले. तर संचालन हर्षवर्धन मडावी यांनी केले. यावेळी सभेत उपस्थित मान्यवरांनी स्व. मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या.
या आठवणींनी सभागृहातील उपस्थितांचे हृदय स्पर्शले आणि मा. अजितदादा पवार यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा केला.

0/Post a Comment/Comments