इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या.. आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील घटना..

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 




आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या कोजबी येथील इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.1..2.2026 रविवार रोजी सायंकाळी 4.30 वाजे सुमारास कोजबी येथे घडली. संस्कार विनोद कन्नाके वय 10. वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील संस्कार विनोद कन्नाके हा दि.1.2.2026 रविवार रोजी शाळेला सुट्टी असल्याने दिवसभर गावात इकडे तिकडे खेळत होता . आणि त्याचे आई वडील सुद्धा घरी नव्हते ते बाहेर गावी



 कामाला गेले असल्याची माहिती  आहे. रविवार रोजी सायंकाळच्या 4 वाजे  सुमारास    तो स्वतःच्या घरी घराच्या फाट्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांना एकच धक्का बसला . सदर घटनेची  माहिती लगेच गावातील पोलिस पाटील यांना देण्यात आली . पोलिस पाटील यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली आरमोरी पोलिस लगेच तातडीने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृताचे शव ताब्यात घेऊन उतरणीय तपासणी करिता आरमोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविले घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत. इयत्ता चौथ्या वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परीवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे.गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments