सर्वोदय वार्डातील पांचाळ समाजातर्फे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी.

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - पांचाळ समाज सेवा समिती सर्वोदय वार्ड गडचिरोली च्या वतीने येथील विठ्ठल मंदिरात श्री प्रभू विश्वकर्मा जयंती अत्यंत भक्तिभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात श्री प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद नरोटे नगराध्यक्ष प्रणोती निबोंळकर नगरसेवक शेखर आखाडे नगरसेवक शिल्पा हेमके नगरसेवक पराग पोरड्डीवार आदिची उपस्थिती लाभली होती कलस यात्रा व पालखी मिरवणुकीत पांचाळ समाज बांधव एकत्र आलेत याप्रसंगी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले व शेवटी सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमास पांचाळ समाजाचे अध्यक्ष विजय विरवार सचिव कविता विरवार , प्रविण मुनघंटीवार वनिता मुनघंटीवार संतोष विरवार विनल विरवार अनंता कत्रोजवार आदि सहीत बहुसंख्य पांचाळ समाजाचे नागरिक उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments