विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज
गडचिरोली जिल्हा अंतर्गत येत असलेल्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे ८ व ९ फरवरीला भव्य सेवक संमेलन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य दिव्य सेवक संमेलन व शोभे यात्रेच्या निमित्ताने कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली चे अध्यक्ष दिवाकरजी ठेंगरी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विजयजी दोनाडकर संचालक फाल्गुनी मानकर संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर गोविंदरावजी दोनाडकर, गुणवंतजी फटे, रमेश वकेकर ,विठ्ठल राऊत, भजन रावजी पदा ,परसरामजी भोयर, भास्कर मानकर, रवींद्रजी राऊत रवींद्र कांबळे ,संतोष गोंदोळे ,माणिक मानकर आदी संचालक गण व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती सेवक संमेलनाला लाभणार आहे. सावंगी येथे होत असलेल्या भव्य दिवस सेवक संमेलन हे समाजामध्ये घडणाऱ्या वाईट चाली रीती, अंधश्रद्धा ,हुंडाबळी वाईट व्यसन ,स्त्रीभ्रूणहत्या मानवाला खालच्या पातळीवर आणणारे वाईट व्यसन आदी विषयावर व मानवधर्मावर आधारित जनजागृती पर मार्गदर्शनातून होणार असून मानवधर्मातील सेवक सेविका बाल सेवक यांनी जास्तीत जास्त संख्येने सदर सेवक संमेलनाला उपस्थित राहून सेवक संमेलनाचा लाभ घ्यावा असे परमपूज्य परमात्मक सेवाभावी संस्था गडचिरोली यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment