विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा संपन्न. विदर्भ निर्माण लॉग मार्च २२ फरवरी ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. वामनराव चटप...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - स्वतंत्र राज्याची निर्मीती झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही याकरीता पुन्हा एक आंदोलन विदर्भ निर्माण जन संकल्प लॉग मार्च व मेळावा रविवार दि. २२ फेबुवारीला शहिद चौक नागपूर येथून निघुन चिटणीस पार्क नागपूर येथे मेळावा होणार असुन त्यासाठी गडचिरोली जिल्हयातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ राज्य निर्मीती आंदोलनाचे प्रमुख ॲड. वामनराव चटप यांनी कार्यकर्तांच्या बैठकीत केले.
संत तुकाराम सार्वजनिक वाचनालय गडचिरोली येथे ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यात अरुण केदार उपाध्यक्ष सुनिल चोखारे माजी मंत्री रमेश गजबे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर सुनिल भोसले डॉ. चंद्ररोखर डोंगरवार अरुण मुनघाटे ,चंद्रशेखर भंडगे आदिची प्रमुख उपस्थिती होती.



बैठकीला राजेंद्र सिह ठाकुर , अशोक पोरड्डीवार , घिसु खुणे शालीक नाकाडे ,विजय खरवडे ,चंद्रकान्त शिवणकर ' गुरुदेव भोपये ,शरद ब्राम्हणवाडे मुक्ताजी दुर्गे आदिसहीत बहुसंख्य विदर्भवादी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments