विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - नगर परिषद सिरोंचा अर्त .गत येत असलेली प्राणहिता नदिवरील ब्रिज ते सिरोंचा पर्यंतचा मुख्य मार्गावरील लाईट गेल्या ४ महिन्यापासून बंदच असल्यामुळे पायदळ , सायकलस्वार टु व्हिलर वाल्यांना त्रास सहन करावा लागतो.
प्राणहिता ब्रिज च्या पलिकडे तेलंगणा राज्य सिमा असुन या मुख्य मार्गावर केंद्रिय मंत्री नितिन गडकरी साहेबांना लाईन टाकून लाईट लावण्यास सहकार्य केले होते जेणेकरून सिरोंचा व तेलंगणा चा प्रवास सुखकर होइल परंतु गेल्या चार महिन्यापासून सदर रोडवरील लाईट बंदच आहेत.
सदर नक्षलग्रस्त भागात तेलंगणा रामागुंडम चे पोलीस चौक लावुन अंधाराच बसतात टोला ते धरमपुरी लॉज कडे जाणेही कठीण झाले आहे. आता तर मेडाराम येथे कुंभमेळा सुरु आहे. सिरोंचा भागातील अनेक भक्तगण प्रशिद्ध कुंभमेळाला जातात त्यांनासुद्धा अंधाराचा सामना करावा लागतो परंतु नगर परिषद सिरोंचा चे दुर्लक्ष होत आहे.

Post a Comment