विदर्भ दखल न्यूज
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली दि. 24:
राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे रविवार, दि. २५ जानेवारी आणि सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ दोन दिवसीय गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोली येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गडचिरोली येथील पोलीस विश्रामगृहात आगमन. सायंकाळी ७:१५ वाजता लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
सोमवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ९:१५ वा. पोलीस कवायत मैदानावर भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि संचलन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ वा. गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

Post a Comment