जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम संपन्न...



विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


गडचिरोली,  दि.: 25 जानेवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असून 25 जानेवारी 2026 रोजी 16 वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि.25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.00 वा. साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष, अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली नितिन गावंडे, प्रमुख अतिथी प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली, संतोष आष्टीकर, तहसिलदार, तहसिल कार्यालय, गडचिरोली, सागर कांबळे, नायब तहसिलदार, ज्ञानेश्वर ठाकरे, शाहीद शेख, शासकीय औद्योगीक संस्था, गडचिरोली येथील शिक्षक व विद्यार्थी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. 16 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “My India My Vote” हा विषय (Theme), आयोगाकडून देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्यात आली.



निवडणूक विषयक जागृती निर्माण करण्याकरीता शाळा व महाविद्यालय स्तरावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धामध्ये गुणक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहे. अशा नवमतदारांना मतदान कार्ड वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार, सागर कांबळे यांनी केले. मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढवा व त्यांच्यात मतदानविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी याबाबत अध्यक्ष, अपर जिल्हाधिकारी नितिन गावंडे यांनी मार्गदर्शन केले.

0/Post a Comment/Comments