डॉ. सखाराम झोडे यांचा रेपनपल्ली ग्राम सभेकडून सत्कार.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


अहेरी - मौजा रेपनपल्ली  जि . प . उ . प्राथ.शाळा , रेपनपल्ली ( जू ) येथे कार्यरत पदवीधर शिक्षक
 डॉ . सखाराम अंकुलु झोडे यांचे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कामगिरीची दखल घेऊन ग्राम सभा , रेपनपल्ली कडून " प्रजासत्ताक दिन " औचित्य साधून डॉ . सखाराम झोडे यांचा पुष्पगुच्छ ,शाल आणि श्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला .
        या वेळी ग्राम सभेचे अध्यक्ष  बंडु सडमेक , सचिव सत्यम आत्राम सौ . छाया सडमेक ग्राम पंचायत सदस्या तसेच श्री विनोद येलम शा . व्य .स . अध्यक्ष , विनोद सिडाम माजी अध्यक्ष राकेश सडमेक शिक्षण तज्ञ शमराव सिडाम . निवास सिडाम राहुल सिडाम , तिरुपती सिडाम कु . कांता सिडाम सौ येमुना येलम सौ . पिंकी सिडाम सौ . काजल सिडाम कु . संध्या आत्राम अन्य मान्यवर उपस्थित होते .
       सत्काराला उत्तर देतांना डॉ सखाराम झोडे म्हणाले की , भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि न्याय या राष्ट्रीय मूल्यांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे दृष्टिने प्रयत्न करणे काळाची गरज आहे . मला आशा आहे. आपण ग्राम सभे मार्फत हे कार्य करावं ही अपेक्षा आहे . तसेच संविधान समाजाच्या विकासाचा आत्मा आहे . संविधान आहे म्हणुन आपण येथे एकीने आहोत . सर्व गाव एकमताने राहाल ही अपेक्षा करतो . आपण माझा सत्कार केल्या बद्दल मी आपले आभारी आहे .
    तसेच यावेळे डॉ. सखाराम झोडे यांच्या कडून ग्राम सभेच्या सदस्यांना संविधान ग्रंथ भेट देण्यात आले . सुत्र संचालन श्री .देवकत्ते सर तर आभार कु . कुळसंगे मॅडम मानले .

0/Post a Comment/Comments