भामरागड तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे वतीने जनजागृती..

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


भामरागड - -गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील सर्व आदिवासी शासकीय,अनुदानित आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा.अंनिस) वतीने गेल्या आठवड्यात 'जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर विशेष जाणीव जागृती, प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी आणि सामाजिक कुप्रथांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे मुख्याध्यापक होत, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंनिसचे कार्यकर्ते रामभाऊ डोंगरे राज्यकार्यकारिणी सदस्य,गौतम पाटील उपाध्यक्ष जिल्हा नागपूर,विनायक रामटेके उपाध्यक्ष मूल शाखा होते,यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "अज्ञान आणि भीतीपोटी अनेकदा ग्रामीण व दुर्गम भागात जादूटोणा, करणी-बाधा यांसारख्या अनिष्ट प्रथांना खतपाणी मिळते. विद्यार्थ्यांनी अशा भोंदूगिरीला बळी न पडता प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधला पाहिजे. "केवळ भाषणे न देता, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी काही 'चमत्कार' करून दाखवले आणि त्यामागील लपलेले विज्ञान उलगडून सांगितले. यामध्ये *लंगर सोडवणे,पैशाचा पाऊस, रस्सी कापून जोडणे,यांसारख्या प्रयोगांतून 'चमत्कार नसून हे हातचलाखी व विज्ञान आहे', हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. कायद्याची ओळख यावेळी 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम-२०१३' या कायद्यातील महत्त्वाच्या कलमांची माहिती देण्यात आली. नरबळी, अघोरी प्रथा आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कशी तक्रार करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात
आले.; "शिक्षणामुळे विचारांची कवाडे उघडतात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून समाजातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करावा.";रामभाऊ डोंगरे, राज्यकार्यकारिणी सदस्य मअंनिस. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी 'आम्ही अंधश्रद्धेला थारा देणार नाही' अशी शपथ घेतली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शाळांमध्ये भामरागडातील हलेवारा, जांभिया, कसनसुर,कोठी, ताडगाव, तोडसा, जारवंडी, लाहेरी, हेमलकसा,भामरागड,भामरागड२, चिचोंडा, मन्नेराजाराम, बिनागुंडा,एटापल्ली, बर्गी, भापडा, कोटमी, पंदेवाही, गेदा, हेडरी, घोटसुर, उडेरा , गर्देवाडा एकूण २४ आदिवासी आश्रम शाळेवर कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्या त्या शाळेतील शिक्षकांनी केले, तर आभार प्रदर्शन त्या त्या शाळेतील मुख्याध्यपकांनी मानले

0/Post a Comment/Comments