अज्ञात ट्रकने 40 मेंढ्यांना चिरडून मेंढपाळास केले जखमी चाकल पेठ फाट्यावर मुख्य मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक थांबवण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली .


चामोर्शी -चामोर्शी ते भेंडाळा मार्गावरील चाकलपेठ फाट्यावर अज्ञात ट्रकने 40 मेंढ्याना चीरडले
मेंढपाळ गंभीर जखमी केल्याची घटना आज
दिनांक 13 फरवरी 2026 ला पहाटे 4.00 वाजता च्या दरम्यान चामोशी ते भेंडाळा मार्गावरील चाकलपेठ फाट्यावर मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन आपल्या स्वभावी रामाळा येथे जात असताना ट्रकने धडक दिल्याने मेंढपाळ मारोती रामा अण्णावार वही 55 वर्ष राहणार रामाळा व त्यांचा मुलगा अतुल मारोती अण्णावार हे गंभीर जखमी झाले तसेच 40 मेंढ्या चिरडल्या गेल्या त्यामुळे मेंढपाळाचे फार नुकसान झाले जखमी मेंढपाळास गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले त्यांना डोक्याला खूप मोठी गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर रुग्णालयात रेफर करणात आले.
गडचिरोली जिल्ह्यात दिवस रात्र ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने असे अनेक अपघात होत आहेत व नागरिकांचे नाहक बळी जात आहेत परंतु प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित ट्रकचा ताबडतोब शोध घेऊन संबंधितावर योग्य कारवाई करून मेंढपाळास नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच सुरजागड लोह प्रकल्पाची ओव्हरलोड वाहतूक वाढल्याने दररोज अपघाताची मालिका चालूच आहे. तरी होणारी ओव्हरलोड वाहतूक थांबवावी .अन्यथा वंचित वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी आपले निवेदनाच्या माध्यमातून दिला.

0/Post a Comment/Comments